मातंग समाजाचे आणि कामगारांचे देवत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक छेडानगर चेंबुर, मुंबई येथे कधी उभे राहणार आहे. महाराष्ट्र सरकार व मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांना 50 लाख मातंग समाजाचा एकमजल आहे की, हिंदू मातंग दलितांची मतं चालतात आणि मग साहित्यरत्ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक का उभारले जात नाही? गेल्या 25 ते 30 वर्षापासून महाराष्ट्र परिवर्तन सेना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वर्षानुवर्ष लढत आली आहे प्रत्येक अधिवेशनात धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे हे चालूच असतात. सा. लो, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा सरकारने गांभीर्याने विचार न केल्यास व २ एकर मागणी केलेली जागा तात्काळ मंजूरन केल्यास येणाऱ्या निवडणूकांमध्ये मातंग समाज थडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे महाराष्ट्र परिवर्तन सेना पक्षाचे मत असून मातंग समाजातील जनतेचे देखील मत आहे, मातंग समाजाला सरकारने गुळ लावलेला आहे. परंतु येणा-या 2024 च्या विधानसभा निवडणूकीत जरांगे पाटला सारखा निर्णय 50 लाख मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच मातंग समाज हा गप्प बसलेला नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करेल. लवकरात लवकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक चेंबूर येथे उभारावे असे आवाहन महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी केले.