नगरसेविका प्रिती साटम यांचा इशारा
गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरातून गोरेगाव- मुलुंड लिंक रोडचे काम सुरु असून या प्रकल्पामुळे या संतोषनगर भागातील सार्वजनिक शौचालय बाधित होत होते. हे बाधित शौचालय लिंक रोडच्या प्रकल्प कामासाठी तोडण्यात आले आणि त्याजागी पर्यायी पोर्टेबल शौचालयाची सुविधा देण्यात आली.
परंतु हे पर्यायी शौचालय सुस्थितीत नसल्याने तसेच त्याठिकाणी दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे येथील सुमारे ३०० कुटुंबांना रस्ता क्रॉस करून जावे लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता याठिकाणी सिंगल विटांचे बांधकाम करून प्रकल्पांचे काम पूर्ण होईपर्यंत शौचालय उभारुन द्यावे
अशा सूचना मा. नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन कराव लागेन असा इशारा प्रकल्प व्यवस्थापन आणि पर्यायाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत