केतन खेडेकर
मोदी सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काँग्रेस ने रान पेटवले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर सत्तेत आली तर सामान्य जनतेसाठी काय करणार आहे याची माहिती असलेली 50 पानाच्या एक हजार पुस्तिका मुंबई काँगेस मागासवर्गीय सेल चे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने पाठवणार असल्याची माहिती दिली.
मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेल चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकाने केलेल्या मनमानी कारभारविरोधात निदर्शने करत या 50 पानी न्यायपत्राच्या प्रती दाखवत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे..काचरू यादव संघर्ष करो हम तूम्हारे साथ हे.. अशा घोषणा दिल्या.
वाढलेली महागाई , शिक्षणाचा विभागाचा झालेला फज्जा , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता ,धर्माच्या नावाने सुरू असलेला मनमानी प्रकार , पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे व काँग्रेस च्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल याचा सर्व लेखा जोखा या 50 पानी पुस्तिकेत दिला आहे. असे कचरू यादव यांनी यावेळी सांगितले.
सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय कसा होईल यासाठी भाजपा सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली
जनता त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असे काचरू यादव यांनी यावेळी सांगितले.