केतन खेडेकर
कुलाबा विधानसभा दक्षिणमुंबई येथील महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृह येथे काल शुक्रवार, २६ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीचा विजय विक्रमी मताधिक्यांनी होणार या विश्वासाच्या वातावरणात ‘अब की बार भाजप तडीपार’ या घोषणेच्या जल्लोषात संपन्न झाला.
या मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री. रवि बावकर, श्री. भवरसिंह राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. बबन कनावजे, दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री. रूपेश खांडगे, तालुका अध्यक्ष श्री. मंगेश सुर्वे, श्री. उमर लकडावाला, आम आदमी पार्टी चे मुंबई कार्याध्यक्ष श्री. वंझारी, श्री. दिपक सीलान, श्रीमती रूकसाना मेसानीया, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते श्री. राजकुमार बाफना, माजी आमदार श्री. अरविंद नेरकर, श्री. अशोक धात्रक, माजी नगरसेविका श्रीमती अरुंधती दुधवडकर, श्रीमती सुजाता सानप, महिला विभागसंघटक श्रीमती युगंधरा साळेकर, माजी विभागप्रमुख श्री. प्रकाश भउड, माजी महिला विभागसंघटक श्रीमती जयश्री बळ्ळीकर, श्री. गणेश सानप, श्रीमती विशाखा पेडणेकर आणि दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक श्री. सुधीर साळवी व श्री. सत्यवान उभे, ज्येष्ठ समाजसेवक श्री. केशवराव भोसले तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील निष्ठावंत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#ArvindSawant #आपलामाणूस #LokSabhaElections2024