केतन खेडेकर
सागर समता परिश्रम बाेरी चाळ आयोजित श्री साई पालखी पदयात्रा साेहळा श्री साई महाप्रसाद कार्यक्रमास माऊली प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष, कुंटुबसखी अध्यक्षा साै. पल्लवीताई पांडूरंग सकपाळ यांनी सदिच्छा भेट देऊन साई पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या कोणत्याही समस्या असतील. तसेच आपली काही कामे असतील. तसेच आपल्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच सोडवण्यात येतील असे जाहीर आवाहन पल्लवी सकपाळ यांनी या ठिकाणी केले. या कार्यक्रमाला, समन्वयिका श्रीमती अपर्णा ताई सांवत, शाखा संघटिका साै माधुरी पेंढारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.