केतन खेडेकर
खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ” तंत्रज्ञान” कोणतेही असूद्या मात्र ” मंत्र ” तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार व्यासंगी व्यक्ते विजय कुवळेकर यांनी जेष्ठ छायाचित्रकार घन:श्याम भडेकर यांच्या ” शूट आऊट ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी सांगितले.
यावेळी माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे, पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले, लेखणी हि तलवार असते. मात्र घन:श्याम भडेकर यांच्या कॅमेऱ्याची लेन्स ही बुलेट ठरली आहे. त्यांनी काढलेला एक फोटो लाखो शब्दापेक्षा मोलाचा आहे. जीवनात काही प्रसंग असे येतात त्यावेळी आपल्याला राग येतो. मात्र घन:श्याम भडेकर यांना मी कधीही रागावलेले पाहिले नाही. आज त्यांच्या १९१ पानी शूट आऊट या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची गुंफण घन:श्याम यांनी केली आहे. त्यांची अशी अजून शंभर पुस्तके निघोत हिच सदिच्छा असे संदीप चव्हाण म्हणाले.
यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे यांनी चारोळ्याच्या माध्यमातून घन:श्याम भडेकर यांच्या पुस्तकाचे व त्यांचे कौतुक केले. तर संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे यांनी घन:श्याम भडेकर यांच्या सोबत सुरू केलेली कारकीर्द कशी होती याबद्दल सांगितले. माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे म्हणाले, १६ वर्षा खालील व महिलांना जबानी घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी जावे असा कायदा आहे.मात्र त्याचे पालन कोणी करत नाही. घनश्याम यांनी त्यांच्या काळातील फोटोग्राफी बद्दल जे काही सांगितले तेव्हा सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या.असे अनेक किस्से सांगत त्यांनी घनश्याम यांचे कौतुक केले. शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी देखील घनश्याम बडेकर यांचे कामाचे आणि त्यांनी केलेल्या या पुस्तकाचे मनापासून कौतुक केले.