केतन खेडेकर
माय मुंबई न्यूज या डिजिटल वे पोर्टलचे नुकतेच शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ,माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्षा पल्लवी सकपाळ, जेष्ठ पत्रकार डॉ सुरेश नगरसेकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक मुळ्ये यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागातील नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील कोणतीही बातमी असो ती छोटी असो किंवा मोठी असो त्या बातमीला प्रसिद्ध करण्याचे काम माय मुंबई न्यूज या वेब पोर्टलवर केले जाईल. आपल्या कोणत्याही समस्या असो त्या समस्या देखील या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. तरी दक्षिण मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण माय मुंबई न्यूज या वेब पोर्टलला नक्की भेट द्यावी.