केतन खेडेकर
भारतीय सैन्य दलानंतर भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पात सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. मात्र रेल्वेची सेवा (Mumbai Local) ही प्रवाशांची आहे की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे. ज्या ठिकाणी त्या कामाची दुरुस्ती करण्याची गरज नसताना ती कामे करोडो रुपयांची टेंडर काढून केली जात आहेत. सीएसटी रेल्वे स्थानक येथिल पायऱ्याचे लदिकरण karnyatbyet आहे. पूर्वीच्या लाद्या या चांगल्या असून देखील कारण नसताना येथे नवीन लादीकरण केले जात आहे. पिण्याचे पाणी नसणे, अस्वच्छ प्रसाधनगृह, बंद पंखे, बसण्यास अपुरी बाकडी, अशी अनेक प्रकारची गैरसोय असल्याने प्रवासी सेवा सुविधा पासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची चूक काय ? ते मोफत प्रवास करतात का ? असे अनेक सवाल करत प्रवासी समिती चे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल मोरे यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत पत्रव्यवहार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे