मुंबई प्रतिनिधी
समाजात काम करत राहणे हेच आमचे ब्रीदवाक्य असून आम्ही सामाजिक कार्य करताना जात धर्म पाळत नाही असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेच्या भायखळा विधानसभेचे आमदार तसेच दक्षिण मुंबई लोकसभेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या उमेदवारांच्या वार्तालाप कार्यक्रमात केले. त्यापुढे म्हणाल्या मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले असून अर्थसंकल्पावरती साडेतीन तास भाष्य केले मला असे वाटते की साडेतीन तास महापालिकेत अर्थसंकल्पावर भाषण करणारी मी पहिलीच महिला नगरसेविका असेल. आम्ही समाजात वावरत असताना अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक भेटतात आम्ही कधीही जातधर्म भेदभाव करत नसून आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे कार्य झाले पाहिजे याच भावनेतून काम करत असतो. स्तनपान करणाऱ्या मतेसाठी मी सार्वजनिक ठिकाणी माता बालक संगोपन केंद्राचा प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव पास झाला असून अनेक ठिकाणी स्तनपान केंद्र त्याला हिरकणी कक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने नाव दिले याचा मला फार अभिमान वाटतो. तसेच गरोदर असणाऱ्या महिला पोलिसांसाठी देखील त्यांच्या कार्यामध्ये त्यांना थोडीशी सूट मिळावी म्हणून त्यांना साडी घालण्याचा देखील जीआर हा माझ्यामुळे निघाला. त्यामुळे एखादी गरोदर महिला पोलीस आपल्या कर्तव्यावर गरोदर असून देखील आपले कार्य चोखपणे पार पाडू शकते. मला असं वाटतं की माझ्यासाठी फार जमेची बाजू आहे. विरोधक हे नेहमीच आमचे कार्याला विरोध करत असतात परंतु आम्ही विरोधकांना आपल्या कामातून चोख उत्तर देत आलो आहोत. दक्षिण मुंबईत सध्या जुन्या इमारतींचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे ज्याला आपण क्लस्टर म्हणतो हे क्लस्टर डेव्हलपमेंट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना आणि भाडेकरूनाना एक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दक्षिण मुंबईची खासदारकीची उमेदवारी देऊन माझ्या फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी मी आपल्या सोबतच आपल्या सहकार्याने नक्कीच पार पाडेन आणि आपल्याला असा अभिमान वाटेल असे कार्य या दक्षिण मुंबईत मी खासदार म्हणून करेन याबाबत तुम्हाला मी ग्वाही देते. यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक,अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी भाजपा शिवसेना महायुतीच्या दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या उमेदवार, आमदार यांमिनी जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासोबत ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश गोरघाटे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.