३० दक्षिण मध्य लोकसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत, भारतीय जनता पार्टीचे माहीम विधानसभेचे महानगर प्रमुख श्री. कमल भगवानदास बेतवाला, श्री. अफजल अखतर सय्यद, श्री. बबलू शारदाप्रसाद बेतवाला, श्री. इरफान सय्यद, श्री. निखिल उसगावकर, श्री. अफताब शेख, श्री. दानिश शेख, श्री. अहाद शेख, श्री. आवेज खान, श्री. साहिल खान यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी विभागप्रमुख श्री. महेश सावंत, विधानसभा संघटक श्री. राजू पाटणकर, माथाडी कामगार उपाध्यक्ष श्री. संदेश शिरसाट, भा.का.सेनेचे सह चिटणीस श्री. अमोल कदम यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.