अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्या सौजन्याने दि.२६ मे २०२४ रोजी नेत्र चिकित्सा शिबिर,नवदुर्गा पुरस्कार वितरण तसेच जगन्नाथ – गुरुकृपा व्याख्यानमाला अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चष्मा,व्हील चेअर्स,वॉकिंग स्टीक्स यांचे मोफत वाटप करण्यात आले.समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्यासपीठावरील कार्यक्रमात दैसप उपाध्यक्ष डॉ.आनंद पेडणेकर, सूर्यकांत कल्याणकर, ॲड मनमोहन चोणकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर , गुरुकृपा फाउंडेशनचे विश्वस्त डॉ.स्मृती रत्नपारखी आणि डॉ.राम चव्हाण,महिला विभाग प्रमुख सौ.आरती मालडीकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
जगन्नाथ – गुरुकृपा व्याख्यानमालेचे पुष्प प्रख्यात नेत्ररोगतज्ञ डॉ.दर्शना शिरोडकर गाडगीळ यांनी गुंफले. नेत्रविकारावर त्यांनी माहिती देऊन डोळ्यांची निगा कशी राखावी हे सांगितले.
दीप प्रज्वलन आणि श्री गणेश,ना.नाना शंकरशेट व समाजश्रेष्ठी जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या प्रतिमेस दैसप पदाधिकारी,गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचे विश्वस्त, नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी यांनी आपल्या भाषणात आतापर्यंत पार पडलेल्या मातृसंस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि आगामी अधिवेशन साहित्य संमेलनात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.डॉ.आनंद पेडणेकर यांनी सुवर्ण कारागिरांनी उद्योग वृद्धिकडे गांभीर्याने पाहणे काळाची गरज असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. ॲड.मनमोहन चोणकर यांनी मातृसंस्थेच्या कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सहभाग घेतल्यास सामाजिक प्रगती साधणे वेगवान होईल असे मत व्यक्त केले.
गेल्या वर्षी नवदुर्गा पुरस्कार प्राप्त झालेल्या सौ.आसावरी पेडणेकर यांनी पुरस्काराने निश्चितच मनोबल उंचावते आणि महिलांनी कठोर मेहनतीने या स्पर्धात्मक युगात आपले स्थान भक्कम केले पाहिजे व ज्ञातीतील महिला ते अंगिकारतील असा विश्वास व्यक्त केला. या वर्षीच्या नवदुर्गा पुरस्काराच्या खालील महिला मानकरी होत्या.उपस्थितांचा शाल ,पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रख्यात ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (अभिनय), सुप्रसिद्ध गायिका सौ.कविता पौडवाल – तुळपुळे (संगीत), एबीपी माझा चॅनेलच्या प्रज्ञा पोवळे ( मिडिया),सामाजिक कार्यकर्ती सौ.अपेक्षा कारेकर ( सामाजिक ), खेडच्या माजी नगराध्यक्षा सौ.गौरी पुळेकर ( सामाजिक ),महिला क्रिकेट प्रशिक्षक सौ.कल्पिता हातोडे (क्रीडा – क्रिकेट), साहित्यिका सौ.कस्तुरी देवरुखकर ( साहित्य), iRS प्रियांका माशेलकर ( शैक्षणिक ) कबड्डीपटू,रिया मडकईकर ( क्रीडा – कबड्डी)
या सत्कारमुर्तींनी सत्काराला उत्तर देताना मातृसंस्था अ.भा.दैवज्ञ समाजोन्नति परिषदेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सुप्रसिध्द गायिका कविता पौडवाल यांनी सुरेल गाणे तर कस्तुरी देवरुखकर यांनी कविता सादर केली.
यानंतर व्हील चेअर्स व वॉकिंग स्टीक्सचे मोफत वाटप करण्यात आले. लाभार्थींमध्ये ज्ञाती बाहेरील काही विकलांग बंधू भगिनींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले. कार्यक्रमास दैसपचे विश्वस्त रवींद्र , माहिमकर, संजय(नाना) वेदक, कार्याध्यक्ष नंदकिशोर वळीवडेकर,विजय पितळे,जितेंद्र पेंडुरकर, सहा चिटणीस सुनील देवरुखकर ,महेश धामणस्कर,खजिनदार दिलीप मालंडकर, सहा.खजिनदार संजीव वगळ , दैसप मुंबई,पालघर विभागीय उपाध्यक्ष अनुक्रमे मोहन म्हाप्रळकर ,अजित सातघरे,युवा विभाग प्रमुख विशाल कडणे , दै.सामनाचे मुख्य वृत्त संपादक पत्रकार राजेश पोवळे, अनिल खेडेकर, सुभाष हरचेकर,संतोष पिसाट,कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, आदि मान्यवरांसमवेत विविध विभागांतील संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते व ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली
सकाळचा अल्पोपहार चहा,कॉफी, फराळ आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.