मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास, बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), नागरी निवारा परिषद प्लॉट नं.६, गणेश मंदिर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आला.
सोहळ्यात ज्येष्ठ स्वामी सेवक श्रीधर कडू, व बाळ पंडित यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून उत्तीर्ण विद्यार्थीचे अभिनंदन करून कौतुक केले.
या सोहळ्यास नागरी निवारा परिषद व संकल्प सोसायटीतील असंख्य भक्तांनी स्वामी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. संस्थेचे मुख्य सेवेकरी – बापू परब, सुनील पडवळ, शुभांगी पवार, मंगेश सावंत, शैलेश गराटे, मिथिता सावंत, विकास साळुंके , व नेहा पाटील सेवेकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन शुभांगी पवार यांनी केले.
,