विदर्भ वैभव मंदिर, मुंबई व द सिव्हिलीयन्स अकादमी (UPSC / MPSC) माजी परराष्ट्र सचिव मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शना खाली संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन शनिवार, दिनांक ८ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ठिकाण १०१ पहिला मजला वैभव पार्क, भवानी शंकर रोड, दादर(पश्चिम), मुंबई-४०००२८ येथे मा. ना. श्री. मंगलप्रभात लोढा साहेब मंत्री,कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते भव्य उद्घाटन सोहळा आयोजीत केला आहे या प्रसंगी सिव्हिलीयन्स अकादमीचे मार्गदर्शक मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, सदस्य – राष्ट्रीय मानवधिकार आयोग भारत सरकार, हे प्रमुख अतिथी म्हणून तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मोहन राठोड विशेष पोलीस महानिरीक्षक मुं सेवानिवृत्त श्री. संजय हावरे उद्योगपती नवी मुंबई, श्री. बाळासाहेब कांबळे अध्यक्ष-लालबागचा राजा मुंबई, श्री. निशिकांत पाटील सहायक पोलीस आयुक्त, मुं. सेवा निवृत्त हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. मुंबई व महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुलांना UPSC / MPSC स्पर्धा परीक्षाबाबत पूर्व तयारी करून घेण्यासाठी विदर्भ वैभव मंदिर, मुंबई संस्थेने हा उपक्रम हातात घेतलेला आहे, महाराष्ट्र बाहेरिल IAS / IPS अधिकारी मोठया प्रमाणात प्रशासकीय सेवेमध्ये दिसतात याच प्रमाणे महाराष्ट्रातील मुल मुली IAS / IPS व्हावे या करिता हा उपक्रम सवलतीच्या दरात चालवण्याचा संस्थेचा उद्देश आहे. महाराष्टातल्या मुलाना पूर्व परीक्षेची तयारी करिता आता दिल्लीला जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी हा उपक्रम विदर्भ वैभव मंदिर, मुंबई व द सिव्हिलीयन्स अकादमी यांनी संयुक्त रित्या सूरु केला आहे. या उपक्रमाचे पहिले सेंटर सुरू होत असून, या कार्यक्रमास सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आजच आपले नाव नोंदणी करावे असे आव्हान संस्थेचे सरचिटणीस श्री. गजानन दे. नागे व सह संचालक श्री. पंकज रेडेकर यांनी केले आहे. श्री. गजानन दे. नागे, सरचिटणीस,विदर्भ वैभव मंदिर, मुंबई यांनी केले आहे.