मुंबई विशेष प्रतिनिधी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ,धारावी,मुंबई आणि आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सौजन्याने स्पर्धा परीक्षेसंबंधी म्हणजेच युपीएससी, सीडीएस (संरक्षण दलात अधिकारी) व एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी) याविषयी माहिती दिली जाणार आहे. इ.10 वी ,12 वी ,पदवी तसेच इतर तत्सम परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण असे विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेतून आपले करियर घडवण्याची इच्छा आहे अश्या सर्वांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री.प्रमोद माने यांनी केले आहे.या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री. बाबुरावजी माने तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या शिबीराला स्पर्धा परीक्षा अभ्यासक व तज्ञ मार्गदर्शक श्री. महेश कुलकर्णी मार्गदर्शन करणार असून दिनांक : ९ जून, २०२४ रोजी सकाळी 11.00 वाजता मनोहर जोशी महाविद्यालय, पीएमजीपी कॉलनी, धारावी बस डेपोजवळ,धारावी, मुंबई-400017 येथे हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे.नांव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: ९२ २१ ८४ ९६५०.