मुंबई प्रतिनिधी
विदर्भ वैभव मंदिर,मुंबई व द सिविलियन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच द सिव्हिलियन्स अकादमीचे माजी परराष्ट्र सचिव माननीय श्री डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून व श्री पंकज रेडेकर यांच्या पुढाकाराने हा भव्य दिव्य उदघाटन सोहळा दादर पश्चिम येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी माननीय श्री मोहन राठोड विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई सेवानिवृत्त अधिकारी, श्री संजय हावरे उद्योगपती नवी मुंबई, प्राचार्य श्रीमती प्रतिभाताई गायकवाड,पाटकर महाविद्यालय श्री बाळासाहेब कांबळे अध्यक्ष लालबागचा राजा मुंबई श्री निशिकांत पाटील साय्यक पोलीसआयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात यूपीएससी / एमपीएससी चे महत्व पटवून दिले. तसेच आमचे योगदान सुध्दा या उपक्रमाला असेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
मुंबई व महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुला,मुलींना यूपीएससी / एमपीएससी स्पर्धा परीक्षा बाबत पूर्वतयारी करून घेण्यासाठी विदर्भ वैभव मंदिर मुंबई या संस्थेने उपक्रम हातात घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील आयएएस / आयपीएस अधिकारी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेमध्ये दिसतात तेव्हा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा मुलं-मुली आयएस / आयपीएस असावेत या एकमेव उद्देशाने सवलतीच्या दरात चालवण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातल्या मुला , मुलींना पूर्व परीक्षेची तयारी करिता आता दिल्लीला जाण्याची गरज भासणार नाही यासाठीच हा उपक्रम विदर्भ वैभव मंदिर मुंबई , द सिव्हिलियन अकादमी यांनी संयुक्तरित्या या उपक्रमाचे पहिले सेंटर दादर मुंबई मध्ये सुरू केलेले आहे . याचा सर्वांना अभिमान आहे!! याचे श्रेय विदर्भ मंदिराचे विश्वस्त मा श्री अशोकरावजी बारब्दे तसेच संस्थेचे सर्वेसर्वा माननीय सरचिटणीस श्री गजाननरावजी नागे व श्री सुधाकररावजी साबळे तसेच संस्थेच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या दूरदृष्टीला जाते.!
या कार्यक्रमास विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष श्री रमेशजी ठाकरे, सरचिटणीस श्री उत्तम लोणारकर, ठाण्याचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भुयार , माजी सरचिटणीस श्री प्रमोद तळोकार विश्वस्त श्री दिनेश देशमुख ,श्री संजय बारब्दे, ज्येष्ठ श्री राजाभाऊ चौधरी, Adv. नवनित भोजने तसेच महिला संघटक श्रीमती माधुरी मेटांगे , विदर्भ वेल्फेअर असोसिएशन अनुशक्ती विभागाचे अध्यक्ष श्री राजेंद्र हटवारजी, मेडीया प्रसिद्धी प्रमुख श्री प्रशांत काळे, श्री लीलाधर बनसोड, श्री शिव पाचाडे, श्री मदन धापसे, श्री सिद्दुभाऊ पडसपगार, भाजप बेस्ट कामगार संघटनेचे श्री आनंद जरग, श्री अनिल यादव, श्री हेमंत गरुड, श्री मुकेश इगवे, श्री सुर्यकांत हेगिष्टे आणि दि सिव्हिलीयन्स अकादमीची टीम श्री अजित खराडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी या क्रार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जानवी सावंत यांनी केले.