भारत देशामध्ये अनेक उद्योजक कलावंत, अभिनेते आणि एक उत्कर्ष, संघर्षमय जीवनातून उभारलेले व्यक्तिमत्व के रवी दादा यांची ओळख संपूर्ण देशाला आहे. त्यामध्ये टाटा आणि बिर्ला यासारखे उद्योजक नवभारतामध्ये निर्माण झाले. त्यामध्ये या उद्योजकांनी समाजाच्या जडण घडणमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये आता रिलायन्स आणि अदानी ग्रुपने स्वतंत्र भारतामध्ये नवउद्योजक म्हणून जगात अव्वलस्थानी येऊन भरारी घेतली आहे. भारतामध्ये मध्यमवर्गामध्ये अनेक उद्योजक घडत आहेत. घडविले जात आहेत. त्यामुळेच मध्यमवर्गीयांच्या उद्योजकाकडे जाण्याचा कल वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला एक बळकटी मिळत आहे. अशा नव उद्योजकांमध्ये अनेक नावे पुढे येताना दिसत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने भारताची आर्थिक राजधानी मुंबई मधून मध्यमवर्गीयांमधून एक अष्टपैलू पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढारलेले उद्योजक के रवी दादा यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मुंबईतील मराठीमोळ कुटुंबातील के रविदादा यांनी लिलया संकटावर मात करीत त्यांनी उद्योगक्षेत्रामध्ये एक अव्वल स्थान पटकावले आहे. यशस्वी उद्योजक असतानाही जमीन स्तरावर राहणाऱ्या के रवी दादा यांनी अवकाशात फिरण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात खरे करून दाखवले आणि आज ते एका हेलिकॉप्टर कंपनी क्षेत्रात एक महत्वाचे उद्योजक स्थान मिळवून ते जनसेवा करीत आहेत. केवळ नफा कमवणे हा उद्देश नसून त्यातून सामाजिक भान राखत त्यांनी या क्षेत्रामध्ये गरीब आणि श्रीमंत या दोन घटकातील दरी कमी करण्यासाठी आपल्या या नव क्षेत्राला समाजामध्ये एक मोलाचे स्थान मिळवून दिले, त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल माहिती घेतली असता त्यांनी सविस्तर चर्चा करताना आपला एक यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा संघर्ष या चर्चेतून उभा केला आहे.
प्रश्न, आपला बालपणापासूनचा जीवन संघर्ष आणि त्यातून आपल्याला कशी यशस्वी उद्योजक जीवन संघर्षाची प्रेरणा मिळाली?
के रवी दादा- मुळातच माझा जन्म हा मुंबईसारख्या महानगरी शहरातला. माझे पंजोबा यांचा जन्म केएम सारख्या पालिकेच्या रुग्णालयात झाला. माझ्या आई-वडिलांचा ही जन्म केएम रुग्णालयात झाला ,साहजिकच मीही केएम सारख्या रुग्णालयात जन्म घेतला आहे. याचा मला अभिमान वाटतो. मुंबईतील केईएम रुग्णालय मला मातृत्व सारखे वाटते. मुंबईसारख्या जगविख्यात शहरामध्ये माझी जडणघडण झाली. त्याचा मला अभिमान वाटतो. जनसंघ आणि आरएसएस सारख्या सामाजिक संस्थांमध्ये काम करताना माझ्या बालपणावर संस्कार घडले. त्यावेळी आयएएस ,आयपीएस अधिकारी आणि राजकीय नेते लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास करीत असताना प्रचंड अप्रूप वाटत असे. त्याचे मला अधिक आकर्षण होते. हवेतून उडणारे विमान पाहून पतंग हवेत उडवताना आपण ही हवेतच तरंगत असल्याचा एक वेगळा अनुभव घेताना त्याचा प्रभाव माझ्या बालपणावर पडला. रेडिओवरील गीते आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमांचा प्रभाव माझ्यावर पडला. अमित सयानी, तब्बूसुम सारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे माझा अभिनयकडे कल वाढला. त्यानंतर कलाक्षेत्राकडे अभिरुची वाढली आणि मुंबई शहरात रेकॉर्ड डान्सर म्हणून नवी ओळख समाजामध्ये निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. लाल दिव्याच्या गाडीत फिरावे म्हणून कलेक्टर होण्याची अभिलाषा अजिबात सोडली नव्हती. त्यामुळे पुस्तक हे माझ्या नेहमी जवळ असे. त्यामध्येच कराटे मधील ब्लॅक बेल्ट ही पदवी मी मिळवली होती. एकदा असाच मी निघालो मुंबईतील एका ठिकाणी भारतीय क्रिकेट टीमची मॅच सुरू होती. भर उन्हात ब्लॅक अँन् व्हाईट टीव्ही वर सर्वच मॅच पाहण्यात दंग असताना भर उन्हात मी त्यावेळी अनेकांना टाईम किती झाला? असे विचारत होतो. एकाने मला टाईम च्या ऐवजी क्रिकेटचा स्कोर सांगितला. एक वाजला असताना त्याने मला अकरा वाजल्याचे सांगितल्याने नंतर ही बाब माझ्या लक्षात आली, त्या भावनेतून राग माझ्यातून अनावर झाला. त्यातूनच मी त्या वादग्रस्त जागेवर एक घनघोर संघर्ष झाला. मी एकटा असताना जनतेने मला साथ दिली . हा माझ्यातील उद्रेक पाहून परिसरात एकच खळबळ माजली. माझ्यातील हा विद्रोह पाहून शिवसेनेचे माजी महापौर वामनराव महाडिक यांनी माझे कौतुक केले.. भाजपचे तत्कालीन प्रसिद्ध नगरसेवक रुस्तुम तिरमदास यांनीही माझा जाहीर सत्कार करून समाजात समाजकार्य करण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे माझ्या कार्याची सकारात्मक चर्चा होऊ लागली, त्यातून मला संजीवनी उभारी आली, इथूनच माझ्या यशस्वी जीवनाचे फलित सुरू झाले . त्यावेळी मी शिवडीला रहात असतानाही भांडुप मधील के टी थापा यांचे लोकही भेटून माझे कौतुक करीत होते. १९८० व्या वर्षी मी रुस्तुम तिरमदास यांच्यामार्फत भाजपचे नेते विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल, त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल ,चेंबूरचे भाजपाचे श्रीचंद तलरेजा आणि माजी खासदार जयवंती बेन मेहता, वामनराव परब यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर नायगाव विधानसभा मधून काँग्रेस कडून विलास सावंत यांना उमेदवारी मिळाली तर भाजपकडून मला विधानसभेची ऑफर होती ती मला माहिती ही बाब विलास सावंत यांना समजले आणि त्यांनी मला निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले विनंती केली. पण तुम्हालाच माहिती नव्हते की भाजप मला विधानसभेचे तिकीट देत आहे. त्यावेळी बाबुभाई भवानजी, एकनाथ गायकवाड, वायलर रवी ही माझ्या संपर्कात होते. परंतु माझे स्वप्न होते मुंबईचा कलेक्टर बनण्याचे सामाजिक कार्यात वाहून घेतल्याने ते स्वप्न अपुरेच राहिले.
त्यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे यांच्याशी माझा चांगला संपर्क होता. विलास सावंत मी म्हटल्याप्रमाणे निवडून आले आणि पुढे मंत्रीही झाले. परंतु मी एक समाजसेवी म्हणूनच कार्यरत राहिलो. तिथूनच एक उत्तम पत्रकार, उत्कृष्ट डान्सर, गायक लेखक झालो आणि पुढे उद्योजक म्हणून भरारी घेतली.
प्रश्न, आपण सामाजिक कार्यातून उद्योजक म्हणून कशी भरारी घेतली? त्याचा प्रवास कसा घडत गेला?
के रवी दादा- टाटा सोशल सायन्स आणि निर्मला निकेतन तसेच प्रयास सारख्या संस्थेच्या सामाजिक कार्याचा प्रभाव पडल्याने मला समाजसेवेची आवड अगदी लहान वयात निर्माण झाली. आतापर्यंत मी भारतासह मुंबईतील वस्त्यांमध्ये प्रत्यक्षरीत्या अनेक समाज उपयोगी कामे केली. शिक्षणाचे महत्व गरीब वस्त्यांमध्ये पटवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. व्यसनापासून नव्या पिढीने अलिप्त राहावे शिक्षणाची त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली. एवढेच नव्हे तर गुंड आणि व्यसनी तरुणांनाही चांगले जीवन जगण्याची त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली, त्याचा मला अभिमान आहे. दिल्लीतील गोल्डन टेम्पल च्या मागणीसाठी भाजपाचा प्रचंड मोर्चा निघाला होता. त्यावेळी आम्ही हजारो कार्यकर्ते दिल्लीतून पंजाब मध्ये गेल्यानंतर गोळीबार झाला. एक गोळी माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून एका महिलेने माझ्या दिशेने धाव घेऊन त्यातून मला वाचवले आणि माझ्या पायाला छाटून ही बंदुकीची गोळी गेली. हा प्रसंग आजही मला भयावह म्हणून आठवतो. या प्रसंगानंतर मला अनेक काही शिकायला मिळाले. पुढे उद्योग क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी मी चॉक म्हणजे खडूची कंपनी सुरू केली. ही कंपनी मुंबई स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये नावाजली गेली. परंतु दिल्लीतून पंजाबला गेल्यामुळे मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेली दीपक चौक या कंपनीने मला मागे टाकले. तरीही मी मागे वळून न पाहता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहिलो परंतु त्यामध्ये अधिक काही जम बसवता आला नाही. त्यातून हार मानली नाही, प्रयत्न करीतच राहिलो. एका बाजूला पत्रकारिता करीत असताना अनेक नामवंत विचारवंत प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांचा संपर्क वाढत गेला. त्यातून माझ्यातील उद्योजक कृतीशीलतेला वाव मिळत गेला. काँग्रेसचे नेते बलराम जाखड, अर्जुन सिंग, अहमद पटेल, अंबिका सोनी, मधु दंडवते, प्रमिला दंडवते अहिल्या रांगणेकर, राष्ट्रपती मोरारजी देसाई, माजी राज्यपाल राम नाईक, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक,माजी मुख्यमंत्री माधवराव शिंधीया, अशा माध्यमातूनच अग्रलेखांचे बादशहा नवाकाळचे संपादक,पत्रकार सुरेश नगरसैकर मिळून प्रॅक्टिकल सोशॅलिझम फोरम चा उपक्रम राबवला. त्याला सामाजिक क्षेत्रात यश मिळाले. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर काढलेला मोर्चा आणि त्याला लोटलेली गर्दी आजही मला आठवते. पत्रकारितेच्या माध्यमातून हाजी मस्तान यांचावर विरोधात्मक केलेले लिखाण त्यातून मस्तान आणि माझ्यात वाढलेले वैर पुढे पारिवारिक मैत्रीमध्ये दृढ झाले. आयपीएस अधिकारी के पी गायकवाड यांच्या माध्यमातून भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीमध्ये साडेतीन हजार बुद्धिस्ट बांधवांचा मेळाव्यात मी पाली भाषेचा विधी 22 मिनिटात बोलल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि माझे कौतुक करण्यात आले. आय एस अधिकारी शशिकांत देठणकर यांच्या माध्यमातून माजी त्यावेळी चे ंद्रीय उड्डाण मंत्री माधवराव शिंधिया यांच्याशी ओळख झाली. पुढे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सहवासात हेलिकॉप्टर एजन्सी मी सुरू केली आणि इथूनच माझा हवाई उड्ढाणाचा नवउद्योग साकार झाला आणि यशस्वीही होऊ लागला.
प्रश्न, गेली अनेक वर्ष हेलिकॅप्टर क्षेत्रामध्ये आपण यशस्वी कार्य करीत आहात त्याचे अनुभव वाटचाली संदर्भात माहिती द्याल का?
के रवी दादा-नक्कीच, बालपणीच अवकाशात वावरण्याचे स्वप्न मी साकार करून हेलिकॉप्टर उद्योगात येऊन एक भरारी घेतली त्याचा मला अत्यानंद आहे. सामाजिक जाणीवेतून माझा जन्म झाल्याने उद्योग क्षेत्रात ही त्याचा प्रभाव पडला. हेलिकॉप्टर उद्योग म्हणजे श्रीमंत यांच्या साठीच आहे असा हा समाजात निर्माण झालेला समज पुसण्यासाठी मी या क्षेत्राचा उद्योगाचा पुरेपूर वापर केला. श्रीमंत गरिबीतील दुरी पुसून काढण्यासाठी अनेक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरीब पीडित माणसाला हेलिकॉप्टर बाबतचे आकर्षण आणि नव प्रेरणा देण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून आपण राबवत असतो. गरिबांना हेलिकॉप्टर मधून फिरवण्याची त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यावेळचे केंद्रीय उड्डाण मंत्री माधवराव शिंधिया याच्याशी संपर्क केला. परंतु त्यांचे अपघाती निधन झाले आणि तो प्रयोग यशस्वी तो प्रयोग परंतु मी न थांबता हेलिकॉप्टर च्या माध्यमातून आतापर्यंत हजारो गरीब जनतेला विनामूल्य सेवा दिली. कुपोषित बालके, आदिवासी झोपडी वाशी अपंग मतिमंद विध, मतिमंद, बेवारस, विधवा, आजी आजोबा , आश्रमातील दांपत्य अशा घटकांना हेलिकॉप्टर मधून फिरवून त्यांच्या जीवनाचा संघर्ष अधिक प्रेरणादायी करण्याचा प्रयत्न केला. अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतानाच भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा वाढदिवस आजही साजरा करीत आहोत.. भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी हेलिकॉप्टर मधून पुष्पष्टी करून एक आगळे वेगळे अभिवादन करून आंबेडकरी जनतेचा भावनेचा आदर केला असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याची यादी काढली तरी ती अपुरी पडेल ,असे मला वाटते. सर्व जाती धर्म पंथ या सर्व अंगातून समाजात काम करीत असताना कलेच्या माध्यमातून लोकभावना समजून घेऊन त्यातून सामाजिक उत्कर्ष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करून सशक्त समाजासाठी प्रेरणा मिळेल, असा प्रयत्न करणे हेच माझे पुढील उद्दिष्ट म्हणावे लागेल.
समाप्त…