मुंबई : गोरेगाव पूर्व येथील, नरेपार्क दिंडोशी म.न. पा. माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनी कु. श्रद्धा शंकर सावंत, हिने नुकत्याच जाहीर झालेल्या इ. 10 च्या परीक्षेत 90.40 टक्के गुण संपादन करून उत्तीर्ण झाली व नरेपार्क दिंडोशी महानगर पालिका शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला.
कु. सावंत ही पेण तालुक्यातील मालदेव गावची सुकन्या असून, ती गोरेगाव येथील संतोष नगर येथे राहते. तीचे वडील एका छोट्या गारमेंट कंपनीत कामाला असून आई गृहिणी आहे.
कु. श्रद्धा हिला हस्तकला, चित्रकला व संगीताची आवड असून, शाळेतून व सामाजिक संस्थाची अनेक पारितोषिके मिळविली आहेत. तिला आय टी इंजिनिअर व्हायचे आहे. शाळेतील शिक्षकाचे मार्गदर्शन व आई- वडिलांच्या आशीर्वादा मुळे हे यश मिळाले असे कु श्रद्धा ने सांगितलं.
अनिर्वेद चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तिच्या सत्कार करण्यात आला. या यशा मुळे संतोष नगर परिसरात तीचे फारच कौतुक होत आहे.