प्रतिनिधी : वै.गुरुवर्य पांडुरंग कारंडे महाराज यांनी १९७८ साली या दिंडीची सुरुवात केली. दिंडीचे हे ४७ वे वर्ष आहे. संत रोहिदास सेवा मंडळ व पांडुरंग प्रतिष्ठान यांना घेऊन श्री संत रोहिदास दिंडी क्र २४ चे भारताचे प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती पूजन,विणापूजन करून संपूर्ण परिसरात रिंगण घेऊन पंढरपूरकडे सोमवारी सकाळी टाळ मृदुगाच्या गजरात मुंबई ते पंढरपूर असा पायी दिंडीचे प्रस्थान झाले, यावेळी दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प.नारायण पाटील महाराज, दिंडी चालक वारकरी भूषण चंद्रकांत कारंडे ,डॉ शांताराम कारंडे,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,याप्रसंगी ताजमहाल हॉटेल तर्फे अल्पोहार देण्यात आला. यावेळी अनेक भकजन वारकरी मंडळी तसेच समाजातील अनेक लोक या दिंडीत सहभागी झाले होते.