वाडिया हॉस्पिटलमध्ये सौ. राखी आणि संदेश खारवी या जोडप्याच्या बाळाला स्वरयंत्राचा पक्षाघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाडिया रुग्णालयातील कान नाक घसा विभागाचे निष्णांत डॉक्टर श्री बाला कुरुप आणि त्यांच्या टीमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून त्यांच्या बाळाला जीवदान दिले. सदर बातमी सामनामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खासदार श्री अरविंदजी सावंत आणि आमदार श्री अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मा. नगरसेवक अनिल कोकीळ आणि पदाधिकारी यांनी वाडीया हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर आणि त्यांच्या टीमचा सत्कार करून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस उपस्थित डॉक्टर बाला कुरूप, डॉ विक्रांत बालोटे, डॉ.सोनल पॉल, डॉ.मुक्ता शिखरे, डॉ. वैदेही दांडे, डॉ, अल्पशा उत्तुरे, डॉ. लेखा शिर्के, डॉ, सुमा एस, डॉ.मृदुला खेडेकर,डॉ. मीनल शहा,आणि उपशाखाप्रमुख प्रदीप मोगरे, उमेश अधिकारी, चंद्रकांत मिसाळ, अनिल चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.