मुंबई : अनिवेद चारिटेबल ट्रस्ट, मुंबई च्या संचालिका, अंजली सरकाळे ह्या गोरेंगाव मुंबई येथे गेली पाच वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.
अंध दिव्यांगाठी स्वयंरोजगार, त्यांच्या कला कौशल्यचा विकास करून त्यांना स्टॉल उपलब्ध करून देणे, महिला व ज्येष्ठ नागरिकां साठी विनामूल्य आरोग्य शिबीर भरविणे, आदिवासी भागात मुलांसाठी व महिलासाठी भेट वस्तू व फराळ वाटप आदी चे आयोजन गेली पाच वर्षे करीत आहे.
त्यांच्या या समाजिक कार्याची दाखल घेऊन, त्यांना ह्या वर्षीचा दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड 2024 देऊन सन्मानीत करण्यात आले. या सोहळ्यास सिनेकलाकार स्नेहा उलाल, हिमानी शिवपुरी अखिलेश यादव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत त्यांना अवॉर्ड प्रदान करण्यात आला.