मुंबई प्रतिनिधी
कुलाबा येथील कायदेशीर आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे पदपथावर धंदा लावल्यामुळे नागरिकांना आणि पादचाऱ्यांना रोडवरून चालावे लागत आहे. रोडवरून चालल्यामुळे गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याना देखील हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया परिसरात अनेक परदेशी पाहुणे आपली मुंबई पाहण्यासाठी येत असतात. त्यांनादेखील या पडपथावरील दुकाने असल्यामुळे चोरीचे आणि विनयभंगाचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा मलिन होत आहे.
आम्ही कुलाबा परिसरातील फेरीवाल्यांना ओवल मैदान या ठिकाणी स्थलांतरित करावे. जेणेकरून कोणाच्या पोटावर पाय येणार नाही. तसेच या स्थलांतरामुळे पादचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना हे पदपथ योग्य रीतीने उपलब्ध होईल. तसेच या परिसरात सिसी टीव्ही लावावे जेणेकरून अपराध घडणार नाही. यासाठी आम्ही महापालिका आणि पोलीस प्रशासनासोबत पत्र व्यवहार केला असल्याची माहिती शिवसेनेचे कुलाबा विधानसभा उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे यांनी दिली.