मुंबई प्रतिनिधी
आरजू स्वाभिमान नागरिक समितीच्या वतीने कुर्ला पूर्व जागृती नगर व अप्पर ठाणे येथे अल्प उत्पन्न गटातील शेकडो कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात आली.या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मेहता व भाजप उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉ भारतीय मोर्चा कल्याण नागेंद्र शर्मा यांनी 40 गरजूंना घराच्या चाव्या वाटप केल्या.यावेळी माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या, संस्थेने आतापर्यंत मुंबई व उपनगरात 4000 हून अधिक घरांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली असून, मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे आणि गरीबांना स्वस्त घरे उपलब्ध करून देणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश असून आमची संस्था अल्प उत्पन्न गटातील लोकांना कर्ज देऊन स्वतःचे घर बनवण्याचे स्वप्न करत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी दिली.