मुंबई प्रतिनिधी
बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके (भाजप प्रदेश प्रवक्ता), सरचिटणीस श्री गजानन नागे( उपाध्यक्ष भाजप कामगार मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश) यांचे सोबत झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व अंतिम सर्व देय देण्यात येणार, सेवा जेष्ठतेनुसार बेस्ट कामगारांना पदोन्नती देण्यात येणार, 25 वर्षापासून सेवेतील कामगारांना पदोन्नती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला, कोविड भत्त्याची रक्कम बेस्ट कडे जमा झाली असल्याची माहिती महाव्यवस्थापकानी दिली. त्याप्रमाणे प्राधान्य क्रमाने रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येईल. केन्द्र सरकारकडून हि रक्कम केव्हाच आली असुन तिचा विनियोग दुसर्याच कामा साठी होत होता. तरी भत्ता लवकरात लवकर कामगारांच्या खात्यावर जमा केला जाईल.याचे श्रेय कुणीच घेऊ नये. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगार बदलीचे निर्देश महाव्यवस्थापक यांच्यासोबत चर्चाकरून घेण्यात आलेत, राहत्या घरापासून जवळच्या डेपोला कामगारांना आगार प्राधान्य देऊन बदल्या कराव्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले आहे. आगारातील उपहारगृह आणि विश्रांतीगृहांचेही दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल. तसेच 1 जुलैपासून सुरू होत असलेले चौमाही ड्युटी शेड्युल रोटेशन मधे खुप कठोर ड्युट्या टाकण्यात आल्या त्यावर चर्चाकरून काही ठिकाणी बदल करण्यात येईल. 2016–2021 च्या कराराचा एरियर्स लवकरात लवकर देण्यात यावा व 2021–2026 चा करार लवकर करण्याबाबत चर्चा करण्यात यावी. तसेच करारानुसार बेस्ट उपक्रमात 3337 बसेस असणे आवश्यक असून आता फक्त 1100 बसेस उपक्रमात कार्यरत असून म्हणून महाव्यवस्थापक यानी 3337 बसेस नवीन विकत घेऊन कराराचे पालन करावेत व यासाठी महापालिका व राज्य सरकार यानी जाहीर केलेला निधी उपलब्ध करून द्यावा यावर चर्चा करण्यात आली. या विषयावर उप-मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी खजिनदार अनिल यादव , सहचिटणीस संतोष काटकर, कार्यालयीन सचिव महादेव खाडे, वडाळा आगाराचे अध्यक्ष दिलीप दौंड, उपाध्यक्ष मच्छिंद्र दहिफळे, संजय वानखडे, कार्यवाह सचिव महादेव खाडे उपस्थित होते.