मुंबई प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४ – २५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण, विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना आणि मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ अश्या अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प महिला पूरक असल्याचे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा यांनी म्हंटले.
महिला ही कुटुंबाचा आधार असते. अनेक महिला कुटुंबाला सांभाळत असतात. या महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी बस प्रवासात ५०% सवलत दिली. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महायुती सरकार महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार आहे. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना महायुती सरकरने आणल्या आहेत. महायुती सरकार हे सर्व सामान्य जनतेच आणि महिलांचं सरकार आहे. याची प्रचिती आजच्या अर्थ संकल्पातून येत असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले.
आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल.. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. मुलींना व्यावसयायिक कोर्सेससाठी फी मध्ये सवलत आणि २५ लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ देण्याचा आमच्या सरकारचा मानस असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले.