मुंबई प्रतिनिधी
सहकारातील जेष्ठ नेते मुंबई शहर सहकारी गृहनिर्माण फेडरेशनचे संचालक यशवंत भाई सावंत यांची निवड करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. गेले 20 वर्षे मुंबई काँग्रेस सहकार सेलची धुरा सांभाळणारे सावंत यांची पुनर्नियुक्ती झाल्यामुळे मुंबई काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही सहकार क्षेत्रात अनेक वर्ष घालवली असून सहकाऱ्यांच्या समस्या आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. हाउसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही सोसायटीचे अनेक विषय सोडवले असून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. यापुढे देखील या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करीन अशी माहिती नवनियुक्त अध्यक्ष यशवंत (भाई) सावंत यांनी दिली. यावेळी मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, सरचिटणीस तुषार गायकवाड, धनंजय कुवेस्कर, श्रीनिवास देवरुखकर, कामगार नेते अनिल गणाचार्य, संजय सावंत, संजय कांबळे,मनीषा चौधरी, लक्ष्मी घोडके, शंकर मोहिते, अशोक देसाई, अब्दुल कादर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.