भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अधिवेशन कामगार मंञी श्रीयुत सुरेश खाडे , प्रदेश सरचिटणीस श्रीयुत संजय किणेकर,श्रीमती माधवी ताई नाईक,सिनेकलावंत किशोरी शहाणे,प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण,प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुळे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप मुंबई प्रदेश कार्यालय वसंत स्मुती दादर पूर्व येथे पार पडले. या अधिवेशनात मुंबई विभाग भाजप प्रणीत कामगार संघटन मजबूत करण्या साठी भाजप नेते उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार भाजप कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी कामगार नेते गजानन नागे यांची मुंबई विभाग प्रभारी पदी नियुक्ती केली.
भाजप कामगार मोर्चा संघटनात्मक मजबूत करणे बुथ स्थरा पर्यंत मोर्चाची बांधणी करून मुंबईतील कामगार भाजप कडे वळवीणे, कामगारांसाठी भाजप सरकारणे घोषित केलेल्या योजना गोरगरीब कामगारां पर्यंत पोचवणे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत कामगार महिलाना फायदा मिळवून देणे,पक्षातील आणि महाराष्ट्र, केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे. याकरीता मुंबई विभाग प्रभारी कामगार मोर्चाने काम करण्याची जबाबदारी कामगार नेते गजानन नागे यांच्यावर सोपवली आहे. मुंबई प्रभारी जबाबदारी दिल्याबद्दल अनेक कामगार कामगार संघटनांनी, विविध सामाजिक संस्थांनी नागे यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मला मिळालेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पारेन आणि माझे पुढील आयुष्य कामगारांसाठी खर्च करेल अशी माहिती कामगार नेते गजानन नागे यांनी दिली.