मुख्य सामाजिक प्रवाहापासून विस्थापित असणाऱ्या दुर्लक्षित आणि शोषित घटकांना सामाजिक जीवनात एक उंची प्राप्त करता यावी आणि शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना प्राप्त व्हावा यासाठी बालगोपाल असोसिएशन (ट्रस्ट) महाकाली अंधेरी (पुर्व) यांच्याकडून
प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ श्री. जी.पी. रत्नपारखी यांच्या गुरुकृपा चारिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या व भंगार वेचून आपली उपजीविका चालवणाऱ्या लहान मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा नेहमी तेवत राहावा म्हणून या 35 मुलांना आज परिपूर्ण असे शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले आणि येणाऱ्या भविष्यात देखील त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी विना अडथळा पार पडेल असा आशावाद या निरागस मुलांना डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिला.