मुंबई प्रतिनिधी
दक्षिण मुंबई विभाग क्रमांक.१४ कुलाबा विधानसभा
शिवसेना शाखा क्रमांक -२२६ मधील ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पावसाळी छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, प्रमुख उपस्थित दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख दिलीप नाईक साहेब यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व महिलांना छत्री वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजने मार्फत कसा जास्तच जास्त महिलांना लाभ घेता येईल या बाबत ही मार्गदर्शन केले. आम्ही नेहमी सामाजिक कार्य करत असतो यापुढे देखील आम्ही युवातील नागरिकांसाठी निरनिराळ्या उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप नाईक यांनी दिली.
या प्रसंगी शाखाप्रमुख संतोष पवार, शाखा समन्वयक दिपक कांबळे, सुरेश चाबुकस्वार व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.