मुंबईमधील माहुल येथील एजीस लॉजिस्टिक ही एक नामवंत मल्टीनॅशनल कंपनी असून, माहुल येथील काम करणाऱ्या कामगारांचे सेवाशर्ती व पगारवाढ इत्यादीचे प्रश्न मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याधर राणे आणि विकास नलावडे हे पाहतात. किरण तरे हे गेली अडीच वर्षे आजारी असल्याने कामावर येत नव्हते. कंपनीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश गुरखे, जनरल मॅनेजर प्रवीण जांगडे यांच्यासोबत युनियन पदाधीकाऱ्यांची बोलणी होऊन किरण तरे याना त्यांच्या गैरहजर कालावधीचा पगार त्यांच्या रजेमध्ये ॲडजस्ट करून त्यांचा ऐच्छिक सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला. या व्यतिरिक्त त्याना तीन लाख रुपये विशेष अर्थसहाय्य देण्यात आले. ॲड. एस. के. शेट्ये आणि विद्याधर राणे यांच्या विनंतीला गिरीश गुरखे , प्रविण जांगडे यांनी सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीमधील युनियनचे प्रतिनिधी जयेश तावडे, एम . एच. साखरे, डी. एल. बोराडे व इतर कामगार प्रतिनिधीनी यासाठी यूनियनपर्यंत श्री. किरण तरे यांचे प्रतिनिधित्व केले. याबाबत श्री. किरण तरे यांनी सर्वांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉइज युनियन