भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा भाव अति प्राचीन आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवाचेच स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल आदर बाळगत, झाडे, नद्या, डोंगर, प्राणी पशु, पक्षी या सर्वांनाच भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे,
वर्तमान स्थिति मध्ये पर्यावरणात वाहनांद्वारे होणारया प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे, परिणामस्वरूप नैसर्गिक साधनांचा ह्रास मोठ्या प्रमाणात होत आहे या होणारया ह्रासामुळे सजिव सृष्टि वर परिणाम होत आहे,यामध्ये प्रामुख्याने मानवि जिवनावर खुप वाईट स्थिति ओढावत आहे,
ओबडधोबड निसर्गाचे सुंदर निसर्गामध्ये रुपांतरण करण्याची बुद्धि प्राकृतिकपणे मानवाला प्राप्त झाली आहे ,त्या अलौकिक बुद्धिमत्ता चा अंगीकार करूण आपण
वसुंधरा समृद्धि अभियान चळवळीत सहभागी होउन भावि पिढ्यांच्या हाती अधिक समृद्ध निसर्ग , स्वच्छ हवा, स्वच्छ व शुद्ध पाणी,देण्यासाठी आपण सर्व एकत्र येउन कार्य करुया प्रत्येक व्यक्ति ने किमान एक वृक्ष लावावा तो जगवावा ,
ज्यांच्या कडे मालकी हक्काचे वाहन आहे त्यानी प्रामुख्याने या अभियान मध्ये सहभागी होउन कार्य करावे
नद्या,नाले,गावातील ओढे यांची निगा राखून त्यांची पाणी साठवण करण्याची क्षमता वाढवूण
भारत भूमि च्या उदरामध्ये अधिकाधिक पाणी जिरवून भारत भू चे उदरभरण करावे,असे आवाहन आपल्या जन्मदिवस प्रित्यर्थ प्रयाश सहेली मंच द्वारा कार्यरत वसुंधरा समृद्धि अभियान प्रसंगी संस्थापक अध्यक्षा ॲड.पुजा प्रकाश एन.यांनी केले.