केतन खेडेकर
मुबंई अंतराष्टीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेवर ८० हजार पेक्षा जास्त झोपडयाचे पुर्नवसनाच्या प्रश्नावर शासनाने कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही. सध्या १२-१२-२००६ ला झालेल्या मियाल आणि एम एमआरडीएमध्ये झालेल्या करार नुसार पुर्नवसन होत नसल्याचे स्पष्ट पणे दिसते आहे. विमानतळ लगत असलेल्या झोपडयां पैकी संदेश नगर व ऋतिनगर बैल बाजार हया ३,७४७ झोपडयांचे पुर्नवसन इतर विमानतळ लगत असलेल्या झोपडयांचे दिशा ठरवणारी आहे. मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ जागेवर जागेवरील झोपडयांचे पुर्न वसनसाठी बांधण्यात आलेले एच.डी.आय.एल प्रिमिअर, विदया विहार, येथील ३० इमारती (१०,००० घरां) पैकी फक्त ३ इमारती विमानपतन साठी आरक्षित केल्या आहे. सदर सर्व पात्र व अपात्र झोपड्यांसाठी घर व सुख सुविधा मुबंई अंतराष्ट्रीय विमानतळ चालवणारी अदाणी कंपनीला दयायची जबाबदारी आहे. परंतु अस काही होत नसुन त्या झोपडी धारांच्या हक्काची घर इतर प्रकल्पात सोपवण्याची काम होत आहे. तसेच झोपडीचे हस्तातरण शुल्क (४०,०००) व सहशुल्क (२,५०,०००) अदाणी कंपनीला भरण्यास न सागंता, झोपडीधारकांना भरायला सागीतल्यामुळे हया मोठ्या संकटातुन गरीबाना वाचवण्यासाठी आम्ही येत्या 5 ऑगस्ट पासून आझाद मैदनत बेमुदत आमरण उपोषण करत असल्याची माहिती घनश्याम भापकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी झोपडपट्टी चळवळ समितीचे
बाळासाहेब वाघ
गणेश गायकवाड, नारायण सावंत, श्रीकांत अडांगळे उपस्थित होते.