मुंबई : ८ व्यां खेतवाडीच्या नाक्यावरचे २०० वर्ष जुने व पुरातन असे पितळे मारोती मंदिरा ह्या इमारतीचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने मूळ जागेवरून विस्थापित करून ते मंदिराच्या मोकळ्या जागेत हलवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांच्या कानी पडली होती. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी स्वतः जाऊन खेतवाडीतील मारोती मंदिराची पाहणी केली असता त्या मंदिराच्या मूळ ढाच्यात विकासकाने मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्याचे दिसून आले. विकासकाने इमारत बांधताना मंदिराच्या जागेचा एफएसआय वापरल्यामुळे रस्त्यासाठी जागा सोडावी लागत असल्याची चर्चा खेतवाडी परिसरात पसरली आहे.
मंदिराचे अस्तित्व आणि पावित्र्य अबाधी राहण्यासाठी आज हिंदू संघटनांच्या वतीने ८ व्या खेतवाडीतील पितळे मंदिर वाचवण्यासाठी सर्व राम भक्त एकवटले असून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या विभागातील नागरिकांनी आणि सर्व ग्राम भक्तांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. खेतवाडी, गिरगाव, ग्रँट रोड, कुंभारवाडा परिसरातील हजारो मंडळी मंदिरात महाआरतीसाठी जमली होती. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अनिल पडवळ, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे कल्पेश वराडकर, मुंबादेवी विधानसभा समन्वयक राकेश वालेकर,श्री राम सेवा संघाचे अध्यक्ष अभिजित पुसाळकर तसेच भाजपा शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील महाआरतीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पितळे मारुती मंदिर त्याकाळी संपूर्णतः साग आणि फणसाच्या लाकडापासून उभारण्यात आले होते. या मंदिराच्या लाकडी छतावर देवी देवतांची सुंदर सुंदर छायाचित्र साकारण्यात आली होती. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण कोकणातील एखादया गावातल्या पुरातन मंदिरात आल्याचा भास व्हयचा. संपूर्ण मंदिर मजबूत अश्या लाकडी खाबावर गेल्या कित्येक वर्षांपासून उभे होते. या मंदिराची मालकी पितळे परिवाराकडे होती. परंतु इमारतीरतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आणि विकासकाची तिरपी नजर ह्या मंदिरावर पडली आणि या जागेचा एफ एस आय वापरण्याची दुर्बुद्धी विकासकला घडली. पाहूया आता मारुतीराया त्या विकासाला कशी अक्कल देतो.
या ठिकाणी स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली असता त्यांना सर्व राम भक्तांच्या रोशाला सामोरे जावे लागले परिस्थिती हाताबाहेर जात असतानाची चाहूल लागताच लोढा यांनी या ठिकाणावरून काढता पाय घेतला.