के रवी दादा यांच्या शॉर्ट फिल्म प्रोमो पोस्टरचा शुभारंभ
मुंबई, बॉलीवूड क्षेत्रामध्ये आणि प्रादेशिकतेवर सध्याच्या स्थितीमध्ये उत्कृष्ट चित्रपट बनवले जात असतानाच सध्याच्या आधुनिकतेमध्ये सोशल मीडिया समाजाचा अविभाज्य भाग बनला आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक के रवी दादा यांच्या कडतोबा प्रोडक्शनच्या रक्षणबंधन शॉर्ट फिल्मला अधिक महत्व प्राप्त होईल, अशी अपेक्षा बॉलीवूड क्षेत्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी गोरेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
गेल्या काही वर्षात मी बॉलिवूड क्षेत्रातील अनेक फिल्म फेस्टिवल पाहिले आहेत. या फेस्टिवलमधून समाजातील विविध मुद्दे लघुपटाच्या माध्यमातून हाताळले गेलेले आहेत. सध्याचा सोशल मीडिया लक्षात घेता सध्याचा प्रेक्षक वर्ग आधुनिक काळामध्ये बदलला गेला आहे. नवीन पिढी ही सोशल मीडियाकडे आकर्षित झालेली आहे, अशा वर्गामध्ये शॉर्ट फिल्म माध्यम प्रभावी ठरवू पाहत आहे. त्यामध्ये कडतोबा प्रोडक्शनचे के रवी दादा यांची शॉर्ट फिल्म एक सामाजिक जाणीवेतून तयार झालेली आहे , ही फिल्म विविध फेस्टिवलमध्ये गेल्यास नक्कीच त्याची दखल घेतली जाईल, असा आशावाद सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन चंद्रा यांनी व्यक्त केला. रक्षणबंधन ही शॉर्ट फिल्म बनविण्याचा विचार माझ्या मनात आला आणि तात्काळ तो मी निर्णय घेऊन हा लघुपट एका दिवसामध्ये पूर्ण केला. कडतोबा प्रोडक्शन हे नेहमीच नव्या कलाकारांना संधी देत आलेले आहे, त्याच माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही नवीन कलाकारांना ह्या क्षेत्रामध्ये आणून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे के रवी दादा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एक आदिवासी कुटुंबातील गरीब मुलगी रक्षाबंधनाच्यादिवशी जागृत होते आणि तिला रंगीबेरंगी राख्या दिसतात. चमकणाऱ्या राख्यांसारखा मलाही चमकणारा फ्रॉक मिळाला पाहिजे, असा हट्ट ती आपल्या वडिलांकडे धरते, आणि त्यातूनच ह्या शॉर्ट फिल्म ला आकार येत जातो. शेवट या फिल्मचा अतिशय गोड आहे, या आदिवासी गरीब कुटुंबाला अखेर राज्य सरकार घरकुल मंजूर करते आणि तिथूनच या कुटुंबाचा उद्धार होतो, असा सामाजिक आशय या लघुपटातून देण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने के रवी दादांनी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी विशेष करून आदिवासी कुटुंबाकडे लक्ष देऊन त्यांना त्यांच्या विभागामार्फत तसेच समाजसेवी संस्थांच्यावतीने धन दांडग्या श्रीमंतांनी आदिवासी कुटुंबांसाठी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत या लघुपटाचे निर्माते के रवी दादा यांनी व्यक्त करताना आशावाद व्यक्त केला. या लघुपटाचे दिग्दर्शक लेखक अशोक झगडे असून संकल्पना आणि निर्माता के रवी दादा आहेत. या लघुपटामध्ये के रवी दादा, मनस्वी गायकवाड, रोशनी दुपारगुडे, राजश्री शेंडे, शरद रणपिसे, महादू पवार, अशोक झगडे, मोहित इंगळे आदींच्या भूमिका आहेत. छायाचित्रण अमोल पारखे यांनी उत्तमरीत्या पार पाडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित झाले होते. बॉलीवूड आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते.