मुंबई प्रतिनिधी
*राष्ट्रकुल संसदीय मंडळ (महाराष्ट्र शाखा) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन यांच्यातर्फे विधानपरिषदेतील उत्कृष्ट कामगिरी साठी सन २०२३-२४ साला करीता देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट भाषण’* या पुरस्कारासाठी आमदार सुनिल शिंद यांची निवड करण्यात आली आहे.
मंगळवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी विधान भवन, मुंबई येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबाबत सर्वच स्थरातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शिंदे यांच्या कार्यालयात त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.